अंतुर्ली परिसरात जुगार जोमात पोलीस मात्र कोमात

अंतुर्ली /प्रतिनिधी

येथील अंतुरली फाटा ते अंतुरली रस्त्यावर असलेल्या एका राज हॉटेलमध्ये जुगाराचा क्लब जोमात सुरू आहे. या क्लब पासून काही अंतरावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दूरक्षेत्र चौकी आहे तरी देखील हा अड्डा जोमात सुरू असल्याने मुक्ताईनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
पोलिसांच्या डोळेझाक अंतर्ली परिसराच्या गुंडगिरीला खतपाणी घालणारा सट्टा जुगार जोमात सुरू असून यात रोज लाखोंची उलाढाल होत आहे.
सत्ता पट्टा खेळणाऱ्यां अनेकांचे संसार रस्त्यावर येत आहे. हे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनाही माहिती आहे फक्त हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दूरक्षेत्र पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना माहित नसते. म्हणूनच “अवैध धंदे जोमात पोलीस मात्र कोमात” अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. याकडे पोलीस प्रशासनाने डोळे झाक केल्याचा आरोपही नागरिकांमधून करण्यात येत आहे परिणामी अवैध धंदे फोपावले आहे. धंद्यांना पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे अवैधंदे पोलिसांचे खाद्य बनल्याची चर्चा सध्या परिसरात चघळली जात आहे.
अनेक जण सट्टा जुगार यामुळे कर्जबाजारी झाले आहेत शेजारीच असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील नागरिक दिवसभर या ठिकाणी पत्ता खेळण्यासाठी व सट्टा लावण्यासाठी येत असतात या कुणावरही पोलीस प्रशासन कारवाई करत नाही एखाद्याच्या तक्रारीवरून कारवाई केलीच तर ती थातूरमातूर कारवाई करण्यात येते व त्यांच्यात एखाद्या पेंटरला अटक करून कारवाई दाखवली जात असते व लागलीस दुसऱ्या दिवशी अवैध धंदा पुन्हा जोमाने सुरू होतो असा हा प्रकार एकंदरीत पोलिसां तर्फेच अवैधंद्याची पाठराखण होत असल्याचे बोलले जात आहे
त्यामुळे आता या अवैध धंद्यांच्या करते करवितांची पाळीमुळे खोदून काढण्याचं काम पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केलं पाहिजे अशी मागणी परिसरातून होत आहे.

एकनाथ खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोपावले असून त्यांच्यावर कुणाचाच वचक राहिलेला नाही. असा आरोप एकनाथ खडसे यांनी मागे विधान परिषदेत केला होता या सर्रास सुरू असणाऱ्या अवैध धंद्यामुळे एकनाथ खडसे यांच्या आरोपाला पुष्टी मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *