सावदा/प्रतिनिधी ज्या दोघांमध्ये वाराही प्रवेश करू शकत नाही. अवघ्या जळगाव जिल्ह्याला ज्यांचं हाडवैर सर्वश्रुत आहे. असे आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे हे एकाच व्यासपीठावर आले असे जर सांगितले तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही परंतु, हे शक्य झालं आहे ते खीर्डी येथील एका कार्यक्रमात मुक्ताईनगर चे दोघेही सुपुत्र एकाच व्यासपीठावर कार्यक्रमात दिसत आहे त्यामुळे हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आमदार पाटील व आमदार खडसे या दोघांचीही एकत्र येण्याचे निमित्त होते, दि रूआल एज्युकेशन सोसायटी संचालित अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय व ह.ल. पाटील ज्युनिअर कॉलेज कला अमृत महोत्सव कार्यक्रम एरवी एकमेकाचे तोंडही न बघणारी ही मंडळी मात्र एका सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या प्रगल्भ विचारांची साक्ष देत आहे दुसरीकडे मात्र त्यांची कार्यकर्ते परस्परांवर चिखल उडवण्यात गुंग आहे. कार्यक्रमातील एक फोटो सामाजिक मीडियावर व्हायरल झाल्याने रावेर तालुक्यातील एका व्यक्तीने चांगलीच या फोटोवर कोपरखळी म्हटली आहे.
ती खास तुमच्यासाठी
रावेर तालुक्यात ही समन्वयाची सुसंस्कृती खूप आधीपासूनच आहे… मुक्ताईनगर मध्ये याची खूप वर्षानंतर छान सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही….