रावेर प्रतिनिधी,
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोंडू रामदास महाजन यांनी पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त यांना ४ जानेवारी २०२४ रोजी धामोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक बेकायदेशीर झाली असल्याची तक्रार केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,
राज्य सहकारी निवडणुक प्राधीकरणाने महाराष्ट्र सहकारी संस्था, (समिती निवडणुक) नियम २०१४ नुसार राज्यातील संचालक मंडळांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रिय सुरू करण्याची घोषणा केल्यानुसार मा. जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांचे पत्रानुसार मौजे धामोडी ता. रावेर जि. जळगांव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धामोडी ता. रावेर जि. जळगांव या संस्थेचा निवडणुक कार्यक्रम जाहिर केलेला होता. सदर जाहिर कार्यक्रमानुसार उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल दि.२३/११/२०२३ व नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख दि.०४/१२/२०२३ ते दि.१८/१२/२०२३ पावेतो सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत होती व मतमोजणीची तारीख ३१/१२/२०२३ अशी होती. सदर धामोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. धामोडी या संस्थेच्या संचालक मंडळासाठी माघारी नंतर निवडणुक लढविणा-या उमेदवाराची यादी दि. १८/१२/२०२३ रोजी निवडणुक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्द केल्या नुसार एकुण १७ नामनिर्देशीत उमेदवारांची यादी दुपारी ३वाजे नंतर माधारीची वेळ संपल्यानंतर यादी तयार करुन पुढील निवडणुक कार्यक्रम घोषीत केला. त्यात दोन बिनविरोध महिला राखीव उमेदवार होते. अशा प्रकारे सदर संस्थेची निवडणुक घोषीत करण्यात आले नंतर दुसरे दिवशी दि. १९/१२/२०२३ रोजी एकुण १७ नामनिर्देशित उमेदवारा पैकी काही उमेदवारांवर अनुचित दबाव आणुन व त्यांना भुलथापा देऊन त्यांना माघारीची मुदत संपल्यानंतर मागील तारखेत माघारीचे अर्ज घेऊन निवडणुक निर्णय अधिकारी यांचेशी संगनमत करुन सदर संस्थेचे संचालक मंडळाची बिनविरोध निवड घोषित करण्याचा गैरप्रकार करण्यात आलेला आहे. तसेच सदर संस्थेच्या निवडणुकीची कार्यक्रम मतदान व मत मोजणी असे दि.३१/१२/२०२३ पर्यंत असतांना निवडणुकीचे कालावधीतच बेकायदेशिर दि. १९/१२/२०२३ या तारखेचे मिटींग अजेंडा काढुन संचालकांनी सदर संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बेकायदेशिर निवड केली. अशा प्रकारे सदर संस्थेत गैरमार्गाने संचालक मंडळाची निवड करुन स्थापना झालेली असुन याबाबत चौकशी होऊन आवश्यकती कायदेशिर कारवाई होणे आवश्यक असुन याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही व आम्हास योग्य न्याय मिळेल तरी विनंती केली असून
वरील संस्थेत गैरमार्गाने निवडुन आलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची चौकशी करण्यात यावी. व योग्य ती कायदेशिर कारवाई संबंधितांविरुध्द करणेची विनंती करण्यात आली असून सदर तक्रारीची प्रत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव आणि तालुका सहकारी निवडणूक अधिकारी सहायक निबंधक सहकारी संस्था रावेर यांना देण्यात आलेले असून त्यासोबत आवश्यक ती पुरावेचे कागदपत्रे जोडलेली आहे
. माजी आमदार अरुण पाटील यांनी पदाचा गैरवापर करून निवडणूक पार पाडलेली आहे. त्यामध्ये तेही सदस्य आहेत. माजी आमदार अरुण पाटील यांचा पुतण्या मंदार पाटील याला या संस्थेचा चेअरमन पदावर बसवायचे असल्याने त्यांनी हा गैरप्रकार केलेला आहे याची सखोल चौकशी होऊन निवडणूक रद्द करावी अशी मागणी मी वरिष्ठांकडे केलेली आहे. –
गोंडू रामदास महाजन माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर
आमच्याकडे आजच मेलद्वारे तक्रार प्राप्त झालेली आहे. ती तक्रार वाचून त्या संदर्भात चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही आम्ही करू.
विजय गवळी
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव
धामोडी येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक संपूर्णपणे कायदेशीर झालेली आहे. समोरील तक्रारदार यांच्या पत्नी या जिल्हा बँकेच्या संचालिका असून त्यांच्या तिसऱ्या अपत्या संदर्भात आम्ही तक्रार दाखल केली आहे व निवडणूक खर्चातही त्यांना अपात्र केले होते. तोच राग असल्याने ते अशा अनाठायी तक्रारी करीत आहेत
–मंदार पाटील
चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी धामोडी