पाच लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत रावेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांचा प्रचाराचा शुभारंभ

प्रतिनिधी I फैजपूर

महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आणि माजी खासदार उल्हास पाटील, तसेच त्यांच्या पाच लाडक्या बहिणींच्या प्रमुख उपस्थितीत खंडेरायाचे दर्शन घेत सपत्नीक पूजा करत प्रचाराचा उत्साहात शुभारंभ केला. याप्रसंगी मंदिराचे उत्तराधिकारी पवनदासजी पुजारी राममनोहर दासजी यांनी आशीर्वाद दिले.

प्रचाराच्या या अविस्मरणीय क्षणी, फैजपूरवासीयांनी अमोल हरिभाऊ जावळे यांचे असे स्वागत केले की संपूर्ण परिसर आनंदाच्या उत्साहात भारावून गेला. महिलांनी औक्षणाने त्यांचा सत्कार करत त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी फुलांच्या वर्षावात त्यांचे भव्य स्वागत केले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण एक अनोख्या चैतन्याने उजळून निघाले. ढोल-ताशांच्या गगनभेदी निनादात, फैजपूरवासीयांनी अमोल हरिभाऊ जावळे यांच्याप्रति असलेले अपार प्रेम व्यक्त केले.

या भावनिक आणि उत्साहपूर्ण क्षणी जनतेच्या मनात अमोलभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला, ज्यामुळे हा प्रचाराचा शुभारंभ एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

यावेळी याप्रसंगी बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. कुंदन फेगडे, भरत महाजन, पांडुरंग सराफ, राष्ट्रवादी जिलाध्यक्ष नेमाडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष समाधान पाटील, भाजपा किसना मोर्चा उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, हिरालाल चौधरी, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, जिल्हा चिटणीस हरलाल कोळी,रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास चौधरी, जि.प.चे माजी सभापती अहमद तडवी, पंचायत समितीचे माजी सभापती पल्लवी चौधरी, सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष पुरोजीत चौधरी, जिल्हा दुध फेडरेशन संचालक नितीन चौधरी, माजी सदस्य हेमराज चौधरी, पल्लवी पाटील, हेमलता इंगळे, मीना तडवी, रावेर तालुकाध्यक्ष महेश चौधरी, यावलचे उमेश फेगडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष बी.के. चौधरी, आशालता चौधरी, महानंदा होले, नितीन राणे, शिवसेनेचे प्रवीण पाटील, यावल तालुका प्रमुख राजू काठोके, शहराध्यक्ष पिंटू तेली- शिवसेना शहर प्रमुख पिंटू मंडवाले, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष भारती पाटील, महिला यावल प्रमुख पाटील, रावेर तालुकाप्रमुख बोंडे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष जयश्री चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी यांच्या सह रावेर आणि यावल तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *