बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर खाजगी बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक

चालकासह तेरा वर्षीय बालक जखमी

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील मुद्दा पुन्हा रेल्वेवर आला असून आज संध्याकाळी सात वाजून 30 मिनिटांनी सावदा शहरा जवळील साईबाबा मंदिराजवळ खाजगी बस आणि ट्रक यांच्या समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे.खाजगी बस मध्ये 18 प्रवासी असल्याचे समजते यापैकी खाजगी बस चालक चौधरी नामक व्यक्ती आशीर्वाद हॉस्पिटल फैजपूर येथे दाखल असुन प्रवाशांपैकी अजंदा तालुका रावेर येथील तेरा वर्षीय बालक किरकोळ जखमी असल्याचे कळते यावेळी सावदा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आले यावेळी सहा.पोलीस निरीक्षक जालिंदर पळे गुप्त वार्ता विभाग देवेंद्र पाटील यशवंत टाकळे पोलीस कॉन्स्टेबल कुरकुरे पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी गृह रक्षक दलाचे जवान यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली खाजगी जेसीबीच्या साह्याने खाजगी अपघातग्रस्त बस बाजूला करण्यात येत होती.https://youtu.be/0s9_HiOhpT0?si=6NY3wYZDrpMycdeh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *