विकासाचे हमीपत्र देणारालाच पाठिंबा; 12 तारखेला करणार निर्णय जाहीर

रमेश पाटील समर्थकांच्या बैठकीत निर्णय
रावेर/प्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. भूमिका काय घ्यावी यासाठी त्यांनी आज आपल्या 200 समर्थकांची बैठक रावेर येथे बोलावली होती. बैठकीत कोणत्या पक्षाला व कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यावर बराच खल झाला. आपण गतकाळात उमेदवारांना पाठिंबा देऊन विजयी केले परंतु रावेर पूर्व भागाचा विकास हा प्रलंबितच आहे. असा सूर या बैठकीत उमटला. यानंतर रावेर पूर्व भागाचा विकासाचा अनुशेष जो उमेदवार भरून काढण्यासाठी हमीपत्र देईल त्यालाच पाठिंबा देऊन विजय करण्याची भूमिका यावेळी समर्थकांनी रमेश पाटील यांच्याकडे मांडली व सर्वस्वी रमेश पाटील घेतील तोच निर्णय आम्हा मान्य राहील असे या समर्थकांनी या बैठकीत सांगितले यामुळे आता रमेश पाटील नेमका कुणाला पाठिंबा जाहीर करतात याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

रावेर तालुक्यात मोठे राजकीय वजन
माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचे रावेर तालुक्यात मोठे वलय आहे अनेक कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली आहे सोबतच त्यांचे चिरंजीव सचिन पाटील बाजार समितीचे सभापती असल्याने अनेक युवा त्यांच्याशी जोडलेले आहेत यामुळे पाटील कुटुंब 12 तारखेला काय निर्णय घेतात व कुणाला पाठिंबा जाहीर करतील त्यांच्या विजयाचे गणित सुकर होईल असे तालुक्यात बोलले जात आहे.

2019 मध्ये चंद्रकांत पाटील व शिरीष चौधरी यांना पाठिंबा

गत विधानसभा निवडणुकीत रमेश पाटील व समर्थकांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील तर रावेर विधानसभा मतदारसंघात आमदार शिरीष चौधरी यांच्या पाठीमागे आपले बळ उभे केले होते यामुळे दोघांनाही विजय सोपा झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *