सावदा येथे पोलिसांचे पथसंचलन

गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद सण व उत्सव शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पडे यांचे नेतृत्वाखाली सावदा शहरात सोमवार (१८)रोजी संध्याकाळी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले.शहरात व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी,अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात पथसंंचालन करण्यात आले सावदा पोलीस ठाण्यापासून ते दुर्गामाता मंदिर पर्यत, गणेश विसर्जन मार्ग, शहरातील मिश्र वस्ती भाग, ईद-ए-मिलाद जुलूस मार्ग या भागात पथसंचलन करण्यात आले.
पथसंचलनात सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पडे, पोलीस उपनिरीक्षक अन्वर तडवी यांच्यासह दोन पोलीस उपनिरीक्षक ३३ पोलीस कर्मचारी 38 गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.
सावदा शहर आणि परिसरात गणेश उत्सवाच्या काळात नागरिकांनी शांतता राखून कायद्याचे पालन करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले गणेश उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त आणि पोलिसांचे गस्त पथक कार्यरत राहणार असल्याचे सहा.पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *