सावदा/ प्रतिनिधी सावदा शहरात पोलिसांकडून बनावट नोटांचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज संध्याकाळी सावदा शहरात दोन इसमांकडे भारतीय बनावटीच्या चलनी नोटा असल्याची गोपनीय माहिती सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्यातील पोलीस पथक तयार करून सापळा रचत संशयित आरोपी शेख आरिफ शेख फारूक अझरखान अयुब खान दोघे राहणार सावदा यांना चलनी नोटांसह अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीच्या शोधात पोलीस पथक प्रमाणात करण्यात आली असून सदर प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे सावदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत
यांचा होता पोलीस पथकात सहभाग
पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप सहाय्यक फौजदार संजय देवरे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव चौधरी पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल यशवंत टहाकळे पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण पाटील पोलीस नामदार निलेश बाविस्कर यांचा समावेश होता.
37 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
संशयित आरोपी यांचे कडून भारतीय बनावटीच्या 100 रुपये प्रमाणे दिसणाऱ्या चलनी नोटा व एक मोटरसायकल असा एकूण 37 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल सावदा पोलीस ठाण्यातर्फे ताब्यात घेण्यात आला आहे.