सावदा प्रतिनिधी
बहुप्रतिक्षित मध्यप्रदेश महाराष्ट्र व गुजरात या तिघे राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर अंकलेश्वर चौपदरी महामार्ग रावेर तालुक्यातूनच जाणार आहे. असे नोटिफिकेशन निघाले आहेत.
बराणपुर अंकलेश्वर महामार्ग रावेर तालुक्यातील रावेर,पातोंडी पुनखेडा तामसवाडी खिरवड मोरगाव कर्जोद वाघोड अटवाडे या गावातून बऱ्हाणपूरला जाईल. कारण या गावच्या भूसंपादन करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून फैजपूर उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग रावेर तालुक्यातून जाणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी नेमका कसा जाईल तरी हे मात्र स्पष्ट झाले नसले तरी रावेर शहराच्या दक्षिण भागातून महामार्ग जाईल अशी चर्चा आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध
एक वर्षा अगोदर मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी बेलखेड धामंदे भोकरी अंतुर्ली या मार्गे या महामार्गाचा डीपी तयार करण्यात आला होता मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता.
रावेर तालुक्याची नाराजी
महामार्ग मुक्ताईनगर मार्गे वळवल्याने रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकार विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती व रावेर तालुक्यातूनच महामार्ग व्हावा अशी मागणी लावून धरली होती