अहो आश्चर्य ! म्हशीने दिला तिळयांना जन्म

रावेर येथून जवळच असलेल्या रावेर स्टेशन (भोर)येथील रहिवासी व माजी पोलीस पाटील श्री धोंडीराम काशीराम घोरपडे यांच्या मालकीच्या म्हशीने आज सकाळी 11 वाजता तिळ्या पारडुंना जन्म दिला पैकी दोन मादी जातीचे व एक नर जातीचे पारडू आहे. रावेरचे पशुधन विकास अधिकारी डॉ रणजीत पाटील यांनी सदर म्हशीची सुखरूप प्रसूती केली.तिन्ही नवजात पारडू स्वस्थ असून म्हशीची तब्येत देखील उत्तम आहे. गाई म्हशीमध्ये जुळे पिल्लांना जन्म ही सामान्य बाब असते परंतु तीन तिळे पिल्लूना जन्म ही फार दुर्मिळ घटना असते असे डॉक्टरांनी सांगितले. मुळे परिसरातून या म्हशीला व पारडूंना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *