सावदा/प्रतिनिधी
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचेवर आमदार एकनाथ खडसे यांनी अतिशय खालच्या पातळी वर केलेल्या वक्तव्याचा निषेध सावदा भाजपातर्फे करण्यात आला.
निषेधाचे पत्र आज फैजपूर उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एका पत्रकाराच्या व्हिडिओमधील गैर अर्थ काढून एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केली आहे. व ही टीका ज्येष्ठ सदस्य म्हणून एकनाथ खडसेंना अशोभनीय आहे. सावदा भाजपा तर्फे एकनाथ खडसे यांचा जाहीर निषेध करतो
निवेदनावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सावदा भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र चौधरी, सावदा शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी,सागर चौधरी,संतोष परदेशी,गुणवंत वयकोले आदींच्या सह्या आहेत.
एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध
