कोचुर ता. ७ : अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या स्वागतासाठी देशभर सगळीकडे तयारी सुरु आहे. मात्र या उत्साहात ग्रामीण भागातील नागरिकही मागे नाहीत. याचीच अनुभूती बोरखेडे सिम, कोचुर खुर्द, कोचुर बुद्रुक (ता. रावेर) गावात रविवारी आले. मंदिरांची प्रतिकृती व अक्षता मंगल कलश स्थापनेच्या स्वागतासाठी आज सगळा गाव लोटला होता. टाळ मृदंग व पावली च्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून भव्य अशी मिरवणूक निघाली. कोचुर बोरखेडे सिम येथील रोकडो बुवा मंदिरापासून शोभा यात्रेला सुरुवात झाली. अक्षता मंगल कलशाच्या निमित्ताने सगळ्या गावात सर्वत्र रांगोळ्या, झेंडे व भगव्या पताकांनी गाव सजले होते जणू प्रति अयोध्येची अनुभूती नागरिक घेत होते.शेकडो स्री, पुरुष, युवक, युवती यांनी पारंपरिक वेशभूषा करीत डोक्यावर कलश घेत सजवलेल्या रथा वरील श्रीराम, लक्षण, सीता असा देखावा लक्षवेधी ठरला. जागोजागी अक्षता मंगल कलश यात्रे वर जागोजागी फुलाचा वर्षाव व मिरवणुकीत असलेल्या तरुण-तरुणी यांनी प्रभू रामचंद्रांच्या घोषणांमुळे गावात भक्तीचा मळा फुलला होता.
कोचुरात श्रीराम कलश यात्रेत सजीव देखाव्याने वेधले लक्ष
