सावदा प्रतिनिधी
मध्य प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात 17 नोव्हेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 17 नोव्हेंबर पर्यंत मध्यप्रदेश राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या दरम्यान जर तुम्ही मध्यप्रदेश राज्यात जात असाल तर सीमा वरती असलेल्या नाक्यांवर मध्यप्रदेश शासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या दरम्यान महाराष्ट्रातून व मध्य प्रदेशातून प्रवेश करणाऱ्या वाहनांचा कसून तपासणी होणार आहे. बऱ्हाणपूर व जळगाव जिल्ह्यामध्ये परस्परांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात आहे.
दिवाळी सण तोंडावर आला असल्याने खरेदी,विक्री अनेक मंडळी बऱ्हाणपूरला पसंती देत असतात तर अनेक महिला मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातून मध्य प्रदेश सासरी व माहेरी अशा ये-जा करीत असतात या प्रवासादरम्यान तुमच्याजवळ जर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असेल तर ती सोबत नेऊ नका कारण चोरवड ,अंतुरली, फाटा भोटा, पाल, इच्छापुर व अन्य आठ ठिकाणी महाराष्ट्रातून प्रवेश होणाऱ्या भागात मध्य प्रदेश शासनाकडून एसएसटी फोर्स तैनात करण्यात आला आहे यात 24 घंटे वाहनांची तपासणी होणार असून सर्वसाधारण माणसाला कोणते प्रकारचा त्रास होणार नाही असे बऱ्हाणपूर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
खबरदार; तुम्ही जर मध्यप्रदेशात जात असाल तर!
