चिनावल परिसरात केळी चे मोठे नुकसानसंतत धार पाऊस व वादळा चा उत्पादकांना फटका


चिनावल ता रावेर ( वार्ताहर ) दि. 15 व 16 तारखेला संपूर्ण केळी पट़यात झालेल्या संततधार पाऊस व पावसा सोबत असलेल्या वारा व वादळा मुळे परिसरातील केळी व मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या मुळे केळी उत्पादक व शेतकरी ना मोठा आर्थिक फटका बसला आहे
चिनावल, कुभारखेडा, वडगांव , विवरा, निभोरा, वाघोदा, खिरोदा, या परिसरा सह संपूर्ण रावेर ,यावल ,मुक्ताईनगर, चोपडा परिसरात अजूनही निम्मे पेक्षा उभे असलेले जुनारी व पिल बाग गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व वादळी वारा ह्या मुळे उखडून पडल्याने उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होवून आर्थिक फटका बसला आहे तर याच परिसरात मका, ज्वारी ला यांचा फटका बसल्याने हातचा आलेला हंगाम वाया गेला आहे
केळी पट़यात किमान 3 हजार हेक्टर वरील जुनारी व पिल बांगाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सद्यस्थितीत केळी ला बर्या पैकी भाव आहे त्यातच ऐन कापणी योग्य माल ह्या नैसर्गिक प्रकोपात जमीनदोस्त झाल्याने उत्पादक सैरभैर झाले आहे आधी च्या मालाला भाव मिळाला नाही उभ्या असलेल्या केळी मालाला तरी भाव मिळेल ही आस धरुन असलेल्या केळी उत्पादक ना पुन्हा एकदा फटका बसल्याने पुढील सर्वच नियोजन कोलमडले आहे
सदर नुकसानी ची दखल शासन कर्ता नी घेऊन महसूल विभागाच्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्याची मागणी चिनावल वडगांव निभोरा विवरा वाघोदा परिसरात होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *