सावदा/प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित छावा चित्रपट उद्या 19 फेब्रुवारी 2024 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत आयोजन करण्यात आले आहे फैजपूर येथील श्रीराम चित्रपटगृहात सुनोदा तालुका रावेर येथील शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थ सुनोदा यांच्यामार्फत बारा ते तीन आयोजन करण्यात आले आहे.
परिसरातील महिला व विद्यार्थिनीं असे 360 प्रेक्षक या चित्रपटाचा मोफत आनंद घेणार आहेत. शिवजयंती उत्सव समिती,ग्रामस्थ सुनोदा व ऍड. राकेश पाटील यांनी कळवले आहे.
मागील तीन वर्षापासून शिवजयंती उत्सव समिती सुनोदा यांचेकडून छत्रपती शिवरायांचे विचार घराघरात पोहोचावे या साठी कोणती ढोल डीजे मिरवणूक न काढता शिव व्याख्यान समाज प्रबोधन पर व्याख्याते यांचे आयोजन केले जात असते. व त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.
छावा चित्रपटाचे मोफत आयोजन
