तांदलवाडी – गाते रस्त्यावर सागवान लाकूड जप्त: अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघड

सावदा 27 जानेवारी 2025 – तांदलवाडी – गाते रस्त्यावर गस्त करीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी एक महत्त्वाची कारवाई करत अवैधपणे वाहतुक केलेल्या सागवानी लाकडाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईतून 41 हजार रुपयाचे1.221 सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे, तर एक मालवाहतूक गाडी क्रमांक एम एच शून्य चार जीएफ 72 63 जप्त करण्यात आली आहे.ज्यामुळे अवैध वृक्षतोडीच्या प्रकारावर कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर व कर्मचारी यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. रावेर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाने मिळालेल्या माहितीनुसार, सागवानी लाकूड वाहतूक करणार्‍या वाहनाला रावेर ते सावदा रस्त्यावर थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान, वाहनातील सागवानी लाकूड अवैधपणे वाहतुक केले जात होते, हे उघड झाले.

अवैध वृक्षतोडीचा प्रकार

अवैध वृक्षतोडी हा एक गंभीर पर्यावरणीय समस्या आहे ज्यामुळे जंगलांचे नाश होते व पर्यावरणीय संतुलन बिघडते. या प्रकारच्या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणार्‍यांना कठोर शिक्षा होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यात मदत होईल.

अवैध लाकूड वाहतूक करताना मुद्देमाला सह पकडल्याने भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 2 व 42 52 या कलमांचे उल्लंघन झाल्याने आगार रक्षक रावेर यांच्याकडील दोन 2025 गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील चौकशीसाठी वाहन आगार डेपो रावेर येथे जमा करण्यात आले आहे

या पथकाने केली कारवाई
वनरक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे जुनूना वनरक्षक जगदीश जगदाळे वाहन चालक विनोद पाटील तसेच पेसा वनरक्षक रावेर रेंज थौऱ्या बारेला केआरसींग बारेला आकाश बारेला निलेश बारेला यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *