सावदा /प्रतिनिधी
सावदा येथून जवळच असलेल्या वाघोदा बुद्रुक गावात गोरक्षकांना मारहाण केल्याचे वृत्त समोर येत आहे. यातील संशयीतांना जेरबंद करण्यासाठी बराणपुर अंकलेश्वर महामार्ग रस्ता रोको आंदोलन हिंदुत्ववादी संघटनेंनी पुकारले आहे.
या घटनेमुळे वाघोदा व चिनावल गावात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी संशयतेंना ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे.
निंभोरा बु गावाकडून वाघोदा मार्गे चिनावल गावाकडे अवैध गो वंश वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता याउलट गोरक्षक व वाघोदा बुद्रुक येथील पोलीस पाटील गणेश भोसले यांना दुसऱ्या गटातील चिनावल व वाघोदा येथील काही तरुणांनी मारहाण केली आहे वाघोदा व चिनावल येथील संतप्त गोरक्षकांनी बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग दुपारी एक वाजेपासून ठप्प केला आहे.
वाहनांच्या लांबच लांब रांगा
संतप्त गोरक्षकांनी व हिंदू संघटनांनी वाघोदा गावाजवळ बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे.