सावदा;राजेश वानखेडे अपघातातून थोडक्यात बचावले

सावदा प्रतिनिधी

माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे हे अपघातातून थोडक्यात बचावले आहे चाळीसगाव येथून शिवपुराण कथेचे श्रवण करून घरी परतत असताना भडगाव येथील वळण रस्त्यावर त्यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातातून वानखेडे बाल बाल बचावले असल्याची माहिती बंटी जंगले यांनी दिली आहे. त्यांचे दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून ते वाचले आहेत प्रत्यक्ष दर्शी च्या माहितीनुसार त्यांच्या गाडीने दोन ते तीन उलट्या घेतल्या. वानखेडे यांना उपचारासाठी जळगाव येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. त्यांना किरकोळ जखमा झाल्या असून ते लवकरच आपल्या घरी येणार असल्याचे बंटी जंगले यांनी सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *