सावदा ; गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

विसर्जन मार्गावर चाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर


सावदा/प्रतिनिधी उद्या दिनांक 2८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी रोजी लाडक्या गणरायाचे विसर्जन होणार आहे तर 29 रोजी ईद-ए-मिलाद ची मिरवणुक आहे.त्यासाठी सावदा शहरातील पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
चिनावलगावाप्रमाणेच सर्व गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करीत आपला आनंद द्विगुणीत करावा व शांततेत मिरवणूक काढावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावत गावातून रुट मार्च आधी केला होता. पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिसअधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शना खाली आज गावात विसर्जन मार्गावर ४० सी सी टी व्ही कॅमेरे, पूर्ण मार्गावर मरक्यूरी लाईट, फ्लॅट लाईट व्यवस्था, मद्य तपासणी, आर टी ओ पथक, यांचे सह स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डी वाय एस पी राजकुमार शिंदे, सावदा पोस्टे चे सपोनि जालिंदर पळे, पो उप निरिक्षक विनोद खाडबहाले यांचे डी वाय एस पी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उप निरिक्षक, 1आर सी पी प्लाँटून , स्ट्रायकीग फोर्स ,1५0 पोलिस कर्मचारी, ४५ होमगार्ड, एल सी बी पथक, गोपनीय पथक, एवढा मोठा पोलीस फौजफाटा राहणार असून मिरवणुकीवर ड्रोन कँमेरा, दुर्बिण, बी डी एस पथक, डेसिबल मिटर चे लक्ष राहणार आहे आजच्या विसर्जन मिरवणुक आनंदाने व शांततेने पार पाडण्याचे आवाहन करत डी वाय एस पी राजकुमार शिंदे ,सावदा पोस्टे चे सपोनि जालिंदर पळे यांनी माहिती दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *