सावदा भुसावळ महामार्गावर भीषण अपघातरावेर येथील तिघांचा मृत्यू तर दोघ गंभीर जखमी

सावदा भुसावळ महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे यात रावेर येथील तीन मित्रांचा जागीच मृत्यू तर दोन मित्र मृत्यूची झुंज देत आहे. भुसावळ येथील मित्राच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम आटपून घरी येत असताना रात्री दोन वाजता पिंपरुड सावदा दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हा अपघात एवढा भीषण आहे की अक्षरशः चार चाकी गाडीचा चुराडा झाला आहे. मृत्यू झालेल्या तिघमित्रांची नावे अद्याप कळू शकली नाही या अपघाताची वार्ता सकाळी रावेर शहरात कानावर पडतात रावेर शहरात मात्र स्मशान शांतता पसरली असून मित्र परिवारातर्फे एकमेकांना फोन लावणे सुरू झाले आहेत तर जखमी असलेल्या दोन मित्रांपैकी एकाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *