सावदा/प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवल आहे. यात जळगाव जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. मुक्ताईनगर मतदार संघाची जागा आमदार चंद्रकांत पाटील यांनी राखली आहे.
रावेर तालुक्यातील 43 गावांचा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात समावेश होतो. 2009 पासून तर 2019 पर्यंत सलग तीन वेळा या 43 गावातून खडसे यांना मताधिक्य राहिल आहे. यंदा देखील या 43 गावांमधून खडसे परिवारालाच मताधिक्य राहणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात होता.परंतु 2024 मध्ये मात्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी आपली ताकद दाखवत आमदार चंद्रकांत पाटील यांना 9445 मतांचे मताधिक्य मिळवून दिल आहे. यामुळे आमदार पाटलांचा विजय सोपा झाला आहे.
भारतीय जनता पार्टीचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन यांचा निवडणुकीतील अनुभव,राजकीय कौशल्य सर्वसामान्यांशी असलेला दांडगा जनसंपर्क यावेळी कामी आला असल्याचे बोलले जात आहे.
नंदकिशोर महाजन यांनी ज्या ज्या निवडणुकीचे सूत्र आपल्या हातात घेतले आहे त्या त्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणला आहे. 43 गावातील प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क साधून सूक्ष्म नियोजन केले. कार्यकर्त्यांच्या साथीने प्रत्येक गावातील अधिकाधिक मतदान महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. असे नंदकिशोर महाजन यांनी यावेळी सांगितले आहे. व यावेळी 43 गावातील संपूर्ण मतदारांचे आभार देखील मानले आहेत. तर आमदार चंद्रकांत पाटलांनी विजय जनतेला समर्पित केला आहे.
43 गावात चालली नंदकिशोर महाजन यांची जादू
