श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा चे आयोजन

प्रतिनिधी/सावदा

येथील पुरातन असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिर श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेचे हे यावर्षी 48 वे वर्षे असून कथेला वक्ता श्री अनंत प्रकाश शास्त्री असून कथेची वेळ दुपारी दोन ते पाच अशी आहे. कथेला दिनांक 23 सप्टेंबर पासून सुरवात होणार आहे. 29 सप्टेंबरला पूर्णाहुती,असून 30 सप्टेंबरला गोकर्ण कथा सकाळी आहे ते कथा संपल्यावर महाप्रसादाचे आयोजन आहे या कथेला कोठारी शास्त्री भक्ती प्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शना खाली कोठारी भक्ती किशोर दास जी,लक्ष्मीनारायण स्वामी, श्रीजी स्वामी सत्यप्रकाश स्वामी भंडारी स्वामी हे कथेत उपस्थित राहतील तर कथेला महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास जी महाराज, शास्त्री स्वामी धर्मस्वरूपदासजी, कोठारी स्वामी गोविंद प्रकाश, दास जी स्वामी के शास्त्री शास्त्री राजेंद्र प्रसाद दासजी , संत सुरेश राजे शास्त्री मानेकर बाबा, महंत श्री कैलास गिरीजी महाराज, कोठारी स्वामी दुर्गादास महाराज, स्वामी स्वरूपानंद जी महाराज, स्वामी प्रेमप्रकाश दासजी, महाराज स्वामी जगत प्रकाशदाजी महाराज या संतगणांची प्रमुख उपस्थिती सप्ताह मध्ये राहणार आहे. सप्ताहात शनिवार रोजी कथा प्रारंभ रविवारी नृसिंह जन्म सोमवारी वामन जयंती मंगळवारी कृष्णजन्म बुधवारी गोपाळकाला गुरुवारी रुक्मिणी स्वयंवर शुक्रवारी सुदामाचे पोहे शनिवारी गोकर्ण कथा सकाळी आठ वाजता व महाप्रसाद दुपारी अकरा वाजता तरी सर्वच भाविक भक्तांनी हरिभक्तांनी भागवत सप्ताह कथेचा श्रावणासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मंदिराचे विश्वस्त चंद्रशेखर पाटील प्रमोद बंगाळे धनंजय चौधरी शिवाजी भारंबे आधी सर्व महिला मंडळ व हरिभक्त यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *