काँग्रेस,भाजपच्या यादीला अमावश्या अडसर
घटस्थापनेचा मुहूर्त
सावदा/पंकज पाटील
बऱ्हाणपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस कडून अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीये. यामुळे बराणपुर येथील भाजप व काँग्रेसची कार्यालय ओस पडली आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर दोघं पक्ष याद्या जाहीर करण्यार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे बऱ्हाणपूर विधानसभा व नेपानगर विधानसभा मतदारसंघातील मतदार मात्र संभ्रमात पडले आहे. बऱ्हाणपूरचे काँग्रेसकडून विद्यमान अपक्ष आमदार सुरेंद्र ठाकूर (शेराभैया) व शहापूर येथील देशमुख परिवारातील इंद्रसेन देशमुख यांची नावे आघाडीवर आहेत. सुरेंद्र ठाकूर व इंद्रसेन देशमुख या दोघांमध्ये काँग्रेस दरबारात चांगली चुरस बघायला मिळत आहे. इंद्रसेन देशमुख यांनी काँग्रेस नेतृत्वाला त्या नावाची दखल घ्यायला भाग पाडले आहे. सीमावरती भागातही इंद्रसेन यांच्या नावाला पसंती आहे.
2018 मध्ये श्रीमती अर्चना चिटणीस यांचा सुरेंद्र सिंग ठाकूर यांनी जवळपास पाच हजार मतांनी पराभव केला होता त्यामुळे भाजप नेतृत्व २०२३ मध्ये ताकही फुंकून पीत आहे. बऱ्हाणपूर विधानसभा मतदारसंघाबाबतीत भाजप कोणताही धोका पत्करायला तयार नाही. बऱ्हाणपूर भाजपा गटातटात विभागली गेली असून यामुळे भाजप नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. अर्चना दीदीच्या कार्यकर्त्यांना आशा आहे की दीदीलास उमेदवारी मिळणार परंतु भाजप अंतर्गत कलहामुळे भाजपमधीलच काही लोकांकडून दीदीला टिकीट मिळू नये यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. बऱ्हाणपूर भाजपा बाबतीत एक फुल पाच माली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेश भाजप शिर्स नेतृत्व आता काय निर्णय घेनार याकडे रावेर, मुक्ताईनगर, बोदवड ,मलकापूर जळगाव जामोद,नांदुरा या सीमा वरती भागाचे लक्ष लागले आहे पुन्हा अर्चना दीदीला तिकीट देणार की नवीन चेहऱ्याला संधी देते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बऱ्हाणपूर; काँग्रेसकडून सुरेंद्र ठाकूर,इंद्रसेन देशमुख तर भाजप नवीन चेहरा देणार.?
