सरपंचांनी आपल्या गावाचा कृती आराखडा तयार करून ठेवावा -श्रीराम पाटील


रावेर/प्रतिनिधी तरूणांकडे व्हिजन असल्याने व समाज, गाव, राष्ट्रासाठी काही करू शकेल या भावनेतून तरूणाईला जनादेश दिला आहे. मी स्वतः विकसित झालो तर माझे मित्र, समुह समाज विकसित होण्याची मनिषा आहे. विकासासाठी तळागाळातील व जनसामान्यांना गृहीत न धरता, सुपर पॉवर व पब्लिक पॉवरच्या बळावर व्यवस्थापन करीत असल्याने विकासासाठी पाठपुरावा करायचा असून सरपंचानी आपल्या गावाचा कृती आराखडा तयार करून ठेवावा, तसेच माझ्याकडे रावेर यावल तालुक्यातील विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे. असे मत श्रीराम पाटील यांनी प्रस्ताविकात व्यक्त केले.
ते श्रीराम फाउंडेशन च्या वतीने रावेर, यावल तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, विविध संस्थांमधील सत्कार समारंभ कार्यक्रमात दि.२० (सोमवार) रावेर बोलत होते.
अध्यक्षस्थानी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे या होत्या.या वेळी श्रीराम फाउंडेशनतर्फे नवनिर्वाचित सरपंच, तथा सहकारी संस्था पदाधिकाऱ्यांचा सोमवारी करण्यात आला. सत्कार
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे,माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीरामपाटील, रा. काँ. महिला प्रदेशाध्यक्ष अॅड. रोहिणी खडसे, सेवानिवृत्त कृषी उपसंचालक अनिल भोकरे, मराठा, मराठा सेवा संघाचे राम पवार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे प्रदेशाध्यक्ष जे. के. पाटील,भाजप महिला जिल्हाध्यक्षा रंजना पाटील, जि. प. चे माजी सदस्य रमेश पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगिराज पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, ड्रिप असोसिएशनचे प्रदेश सचिव सोपान पाटील, रा. काँ. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील आदीच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
रावेर कृउबा सभापती सचिन पाटील व पदाधिकारी तसेच यावल तालुक्यातील साकळी येथील सरपंच दीपक पाटील, खिर्डी बु., रोझोदा, कळमोदा, उटखेडा, थेरोळा, पातोंडी आदी ग्रा. पं. चे सरपंच व पदाधिकाऱ्यांचा स्मृतीचिन्ह, भारतीय संविधानाची प्रतिलिपी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी, कृउबा संचालिका मनिषा पाटील, सुनीता पाटील, सविता पाटील, माया बारी, प्रा. गोपाळ दर्जी, डॉ. सुरेश जी पाटील, प्रल्हाद पाटील, दारा मोहंमद, शीतल पाटील, किशोर पाटील, अशोक शिंदे, सय्यद असगर, अमोल पाटील, बाळू शिरतूरे, दिलीप कांबळे, दिनेश पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भुषण चौधरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *