सावदा येथे संत नरहरी सोनार महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा

सावदाः येथे सावदावासीय सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने संत नरहरी सोनार यांची ७३१ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन तथा प्रतिमापूजन सोहळा मोठ्या भक्तीभावाने जाफर लान्स येथे साजरा करण्यात आला.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी प्रदेश सुवर्णकार संघाचे अध्यक्ष संजय भामरे, सुवर्णकार समाज अध्यक्ष मुक्ताईनगरचे प्रवीण शूरपाटणे, वधु वर मेळावा प्रमुख संजय विस्पुते, उद्योजक विजय वानखेडे, व्यापारी नंदकिशोर बागुल, मुक्ताईनगरचे शिवा उज्जैनकर, ईश्वर बिरारी, ज्ञानेश्वर सोनार, जळगावचे अनिल दापोरेकर, रावेरचे सोपान अहिरराव तसेच सावदा नगरीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष ताराबाई वानखेडे, माजी नगरसेवक राजेशवानखेडे यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व अतिथींचे सावदा सुवर्णकार समाजाच्या वतीने संत नरहरी सोनार यांची प्रतिमा तसेच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सावदा परिसरातील सुवर्णकार समाजबांधव उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत विसपुते यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी राजेश वानखेडे यांनी मनोगतात अल्पावधीतच स्थानिक आमदारांच्या मदतीने महाराजांनी वारकरी संप्रदायासाठी केलेले योगदान पाहता मुक्ताईनगर येथे नरहरी महाराजांचे भव्य असे मंदिर बांधून लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा करून मुक्ताईनगर सुवर्णकार समाज अध्यक्ष प्रवीण शुरपणखे यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक शेखर वानखेडे यांनी तर आभार राजेश वानखेडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सावद्यातील सर्व सुवर्णकार बांधवांनी अमूल्य असे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *