सावदा/प्रतिनिधी वाघोदा बुद्रुक (ता रावेर) येथे अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत बारा हजार रुपये किमतीचे 60 किलो मास जप्त करण्यात आले आहे. तसेच एकाला अटक करण्यात आली.
सावदा येथून जवळच असलेल्या वाघोदा बुद्रुक येथे आयशा मज्जित च्या बाजूला कत्तलखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाली होती या आधारे शुक्रवारी पोलीस पथकाने छापा टाकला यात जनावरांचे मांस जप्त करण्यात आले, सोबत वजन काटा, मास कापण्यासाठीचा सुरा, रोख रुपये सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान याप्रकरणी शेख नईम शेख आयुब कुरेशी (वय 47) रा. रसनपुर ता. रावेर याला अटक करण्यात आली असून सावदा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद नोंदवून सदर आरोपीवर महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (ब)(क,),९,(अ) भारतीय न्याय संहिता 2023 कलम 325, 271 3 (5) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 105 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल 1602 विनोद पाटील हे करीत आहे.
यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे की ज्या ज्या ठिकाणी गोवंश जातीच्या गोवंश जातीच्या जनावरांची मास विक्री होत असेल त्याबाबत पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
ज्या ठिकाणी कत्तलखाना चालू होता ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ओपन स्पेस ची जागा असून या जागेवर कत्तलखाना उभारणेपर्यंत प्रशासनाचे दुर्लक्ष कसे झाले असा संतप्त सवाल गोरक्षकांनी व्यक्त केला आहे. तर हे अनधिकृत कत्तलखाना तात्काळ जमीन दोस्त करण्यात यावा अशी ही मागणी गोरक्षकांनी यावेळी केली.
पथकात यांचा होता सहभाग
पोहेकॉ 1602/ विनोद पाटील, पोहेकॉ 530 किरण पाटील, पोकॉ 2521 बबन तडवी, पोकॉ 3287 मनोज तडवी, चापोकॉ 536 नामदेव कापडे, पोहेकॉ/2472 संजीव चौधरी या पोलीस कर्मचाऱ्यांचा पथकात सहभाग होता