रावेरच्या बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव, 12 संचालक सहलीला

रावेर/प्रतिनिधी येथील रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेच्या पटलावर भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सभापती सचिन पाटील यांच्या विरुद्ध 12 संचालकांनी अविश्वास ठराव आणला आहे. हे 12संचालक सहलीवर रवाना झाल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच २ जणांच्या हालचाली महायुतीकडून गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सन 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत १5 जागा जिंकत महाविकास आघाडीने बाजार समितीत सत्ता मिळवली होती. नंतर झालेल्या घडामोडीत सभापती सचिन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता आता गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्याचा परिणाम बाजार समितीच्याही राजकारणावर होताना दिसून येत आहे.

राजीनामा न दिल्याने अविश्वास?
माजी आमदार अरुण पाटील, तत्कालीन आमदार शिरीष चौधरी,काँग्रेस नेते राजू पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात लढल्या गेलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत
2022 मध्ये बाजार समितीत महाविकास आघाडीने बहुमत मिळवले होते त्यावेळी सभापती पद हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी वाटून घेण्याचे ठरले होते परंतु तीन वर्ष सभापतीपद भूषवल्यानंतरही सचिन पाटील यांनी राजीनामा न दिल्याची सल अनेक संचालकांच्या मनात घर करीत होती त्यामुळेच बाजार समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास आणल्याची चर्चा रावेर तालुक्यात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *