सावदा/प्रतिनिधी अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे दोघे सण एकाच दिवशी येत आहे. सावदा येथील ईद-ए-मिलाद ह्या मुस्लिम बांधवांचा सण दिनांक 29 रोजी साजरा करण्याचा निर्णय सावदा येथील मुस्लिम पंच कमिटी तर्फे घेण्यात आला आहे.
सावदा येथे ईद-ए-मिलाद निमित्त शहरात जुलूस काढण्यात येतो. मात्र 28 रोजी अनंत चतुर्दशी येत असल्याने त्या दिवशी गणेश विसर्जन देखील येणार आहे. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर ठेवत 29 रोजी ईद-ए-मिलाद साजरा करून शहरात जुलूस काढण्यात करण्यात येणार आहे. असे निवेदन सावदा मुस्लिम पंच कमिटी तर्फे सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना देण्यात आले आहे.निवेदनावर शेख शरीफ शेख अब्दुल्ला, हाजी अख्तर हुसेन शेख रहमान, शेख इरफान शेख लुकमान, शेख अल्लाबक्ष शेख नजीर, शेख निसार शेख नबी, शेख आरीफ शेख करीम यांच्या सह्या आहेत. मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
