चिनावल; गणेश विसर्जनासाठी पोलिसांकडून तयारी पूर्ण

30 सी सी टी व्ही, 15 पोलिस अधिकारी व 400 पोलीस कर्मचाऱ्यांची फौज

चिनावल ता.रावेर ( प्रतिनिधी ) संपूर्ण जिल्हाभरात प्रसिद्ध असलेली चिनावल येथील 7 व्या दिवसा च्या गणेश विसर्जना साठी यंदा ही प्रशासनाने मोठा तगडा बंदोबस्त लावत आवश्यक त्या उपाययोजना आखल्या आहेत
दि 25 रोजी चिनावल येथे गणेश विसर्जन होणार आहे चिनावल येथील गणेश विसर्जन मिरवणूक ही परिसरात प्रसिद्ध आहे या मिरवणुकीत गावातील 15 मंडळे सहभागी होणार आहे ह्या अनुषंगाने गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी 1 महिन्या पासुनच नियोजन आखत गणेश मंडळ पदाधिकारी व गावातील पदाधिकारी याना सोबत घेत 4 बैठका ही घेतल्या आहेत
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावत गावातून रुट मार्च करत जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिसअधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शना खाली आज गावात बंदोबस्त साठी मिरवणूक मार्गावर 30 सी सी टी व्ही कॅमेरे, पूर्ण मार्गावर मरक्यूरी लाईट, फ्लॅट लाईट व्यवस्था, मद्य तपासणी, आर टी ओ पथक, यांचे सह स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डी वाय एस पी राजकुमार शिंदे, सावदा पोस्टे चे सपोनि जालिंदर पळे, पो उप निरिक्षक विनोद खाडबहाले यांचे सह 2 डी वाय एस पी, 15 सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उप निरिक्षक, 1 एस आर पी प्लाँटून, 1आर सी पी प्लाँटून ,3 स्ट्रायकीग फोर्स ,10 फाँरेस्ट कंमाडो, 100 पोलिस कर्मचारी, 100 होमगार्ड, एल सी बी पथक, गोपनीय पथक, एवढा मोठा पोलीस फौजफाटा राहणार असून मिरवणुकीवर ड्रोन कँमेरा, दुर्बिण, बी डी एस पथक, डेसिबल मिटर चे लक्ष राहणार आहे आजच्या विसर्जन मिरवणुक आनंदाने व शांततेने पार पाडण्याचे आवाहन करत डी वाय एस पी राजकुमार शिंदे ,सावदा पोस्टे चे सपोनि जालिंदर पळे यांनी माहिती दिली सदर वेळी चिनावल पोलिस पाटील नीलेश नेमाडे हे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *