तिन तलाक व्दारे घटस्फोट देणाऱ्या पतीस दोन वर्षे कारावासासह २५ हजार रुपये दंडाची शिक्षा

चिनावल प्रतिनिधी तिहेरी तलाक द्वारे तलाक देणाऱ्या चिनावल येथील एका इसमास रावेर कोर्टाकडून दोन करावासासह 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2019 साली करण्यात आलेल्या कायद्याअंतर्गत ही शिक्षा झाल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गुरांचा व्यापार करण्यासाठी माहेरहुन ५०,०००/- रू. हुंड्याच मागणी करीत वेळोवेळी शारीरीक व मानसीक छळ करून मारहाण करून जीबे मारण्याची धमकी देवुन तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हणुन बेकायदेशीर रित्या घटस्फोट दिल्याने पिडीत तबस्सुम नाज शेख सत्तार हसन रा. चिनावल ता. रावेर हिने सावदा पोलीस स्टेशन येथे पती शेख हसन शेख सत्तार वय ३० रा चिनावल, ता. रावेर यांचे विरूध्द तक्रार दिल्याने सावदा पोलीस स्टेशला मुस्लीम महीला संरक्षण कायद्यान्वये (तिन तलाक) गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर खटल्याची मा. रावेर न्यायालयात सुनवणी सुरू असतांना एकुण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यात साक्षीदार पंच व तपासाधीकारी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. त्यानंतर न्यायाधीश श्री बाजड यांचे न्यायालयाने आरोपी पतीस दोन वर्ष कारावास व २५,०००/- रू दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सावदा पोलीस स्टेशन चे सपोनि राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाल. पोना सुरेश अढायगे यांनी केला होता, तसेच सरकार पक्षातर्फे एन.डी. तायडे व श्रीकृष्ण दुट्टे यांनी सरकारी वकील म्हणु तर न्यायालयातील पैरवी म्हणुन पोकों संजय बावस्कर यांनी काम पाहीले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *