रावेर/प्रतिनिधी रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे संचालक गणेश महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
रावेर येथील बाजार समिती आवारातील रमेश पाटील यांच्या श्रमसाधना कार्यालयात उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून गणेश महाजन यांना निवडी संदर्भातले पत्र देण्यात आले आहे.
या वेळी उमेश नेमाडे-जिल्हाध्यक्ष
रविंद्र नाना पाटील-प्रदेश सरचिटणीस,अरविंद चितोडीया-युवक जिल्हाध्यक्ष,रविंद्र सपकाळ-सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष,संतोष चौधरी-भुसावळ शहर अध्यक्ष,राजेश वानखेडे सावदा-जेष्ट नेते,रमेश पाटील -मा.जि प सदस्य,सचिन पाटील-सभापती कृ उ बा
जयेश कुयटे-संचालक कृ उ बा हे उपस्थित होते. गणेश महाजन यांची रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदी निवड झाल्याबद्दल राजेश वानखेडे व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी स्वागत केले आहे.
रावेर राष्ट्रवादी तालुका अध्यक्षपदी गणेश महाजन यांची वर्णी
