वाघोदा गणात अमोल पाटलांना सर्वाधिक पसंती विकास कामांमुळे जनतेचा वाढता पाठिंबा
रावेर तालुक्यातील पंचायत समिती च्या बारा गणांचे आरक्षण आज जाहीर झाले.12 गणांपैकी की मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील असलेल्या रावेर तालुक्यातील वाघोदा गणाची जागा सर्वसाधारण सुटलेली आहे यामुळे या जागेवर युवा कार्यकर्त्यांना संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. रावेर तालुक्यातील वाघोदा गणातील पंचायत समिती सर्वसाधारण जागेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, या गणात कोचूर बुद्रुकचे सरपंच अमोल पाटील यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. ग्रामविकासासाठीची त्यांची कार्यशैली, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला संपर्क आणि युवकांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत.अमोल पाटील यांनी आपल्या सरपंच कार्यकाळात कोचूर बुद्रुक गावाला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबतीने विकासाची नवी दिशा दिली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शेत रस्ते, गावांतर्गत काँक्रिट रस्ते, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, अंगणवाडी इमारती, ग्रामपंचायत कार्यालयाचा विकास, शैक्षणिक सुविधा, महिला बचत गटांसाठी कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजनेतील गावातच सुविधा अशा अनेक विकासकामांची अंमलबजावणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला असून गावाच्या विकासाची ज्योत त्यांनी पेटवली आहे, या कामांमुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना निर्माण झाली आहे. कोचुर बुद्रुक सह वाघोदा गणात येत असलेल्या गावांमध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. त्यांचे नाव सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरले असून आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी वाघोदा गणाचे नेतृत्व करावे अशी जनमानसाची भावना निर्माण झाली आहे.स्थानिक पातळीवर ते नेहमीच जनतेशी प्रत्यक्ष संपर्कात राहून शोषित वंचित शेतकरी शेतमजूर कामगार महिला यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्पर असतात. शिक्षण, आरोग्य आणि युवकवर्गासाठी रोजगारनिर्मिती यांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे वाघोदा गणातील मतदारांमध्ये त्यांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.वाघोदा गणातील आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी विविध पक्षांचे संभाव्य उमेदवार तयारीला लागले असले, तरी अमोल पाटील यांचे नाव आघाडीवर राहील, असा अंदाज स्थानिक राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. आज तरी युवकांच्या ओठावर अमोल पाटील यांचेच नाव असून आगामी काही दिवसांत या गणातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
