समरसता महाकुंभा मुळे समरस झाले.

दि.29 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत वढोदा ता. यावल येथे आचार्य महामंडलेश्वर श्री जनार्दनहरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून वढोदा ता. यावल येथे भव्य दिव्य असा “समसरता महाकुंभ” संपन्न झाला. या समरसता महाकुंभ विषयी असेच म्हणावे लागेल “झालेत बहू, होतील बहु, आहेत बहू, परी त्या सम हा” कारण एवढा भव्य दिव्य सोहळा जळगाव जिल्ह्यातील कुणालाही शक्य झाला नाही. असा,आतापर्यंतचा ऐतिहासिक संत सोहळा वडोद्यात पार पडला आहे.

आपल्या देशात विविधतेत एकता आहे. देशातील बहुसंख्य असलेला हिंदू धर्म मात्र वेगवेगळ्या जाती,पंथात विभागले गेले आहे. जाती व पंथातून बाहेर पडून आपण सर्वांना समरस होण्याची नितांत गरज आहे. देशातील हिंदूं धर्मातील प्रत्येक जातीला असेच वाटते की आमची जात श्रेष्ठ, देशातील हिंदू धर्मातील संतांना वाटते आमचाच पंथ श्रेष्ठ. परंतु, समरसता महाकुंभामुळे सारे समरस झाले असून आपण सर्व प्रभू रामचंद्राचीच मुले आहोत.

हिंदू धर्मातील प्रत्येक पंथात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर दांभ संशय चिंता या नऊ विषयांचा नियंत्रणात उपयोग करावा असे सांगितले जाते. जर हिंदू धर्मातील सगळ्या पंथांचे मूळ एकच असेल तर आपण वेगवेगळे म्हणणारे कोण? आपण सारे समरस झाल्यास माणूस पराकोटीचा उत्तम माणूस होईल.पसायदानात ज्ञानराजांनी हेच तर मागितले आहे. जिवांचे मैत्र वाढो असे ते जे म्हणतात तसे होईल म्हणजे सर्व अमंगल भेदाभेद नष्ट होउन विनोबांनी नारा दिला होता तसा “जय जगत्” असा विश्र्वकल्याणाचा मार्ग अस्तित्वात येईल.यात समाजाचे भलेच आहे.प्रगतीच आहे ही मानवाची ! त्याच्या समाजाची. अशा समाजाला देशाच्या पलीकडे जाऊन अवघा रंग एक झाला ही भावना प्रबळ असेल.वसुधैव कुटुंबकम् -हे विश्र्वची माझे घर इतकी विशाल व्यापक दृृृृृृृष्टी झाल्यावर एकाच किंवा स्वतःच्या देशाच्याच व फक्त भौतिक प्रगतीचाच विचार संकुचितच ठरेल. सर्वच मानव जातीची प्रगती विकास,उन्नती हेच साध्य लक्ष्य ठरेल.

संत स्वत:पलीकडे जाऊन संपूर्ण जगाकडे पाहतात. त्यांना सर्व प्राणिमात्रांबद्दलच कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो, त्यांना सर्व माणसे समान वाटतात; सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संतमहात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असे ज्ञानदेव म्हणतात, नामदेवांना वाटते की, सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा. म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वत:च्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांनी एकमेकाला साहाय्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात

एकमेकांना, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी. सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या त-हेने सर्वजण वागू लागले, तर समाजात शांती नांदेल. माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करु शकतात. अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत. दंगेधोपे होणार नाहीत. कोणाची पिळवणूक होणार नाही. कोणाची फसवणूक होणार नाही. कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत, सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे, असे सर्व संत सांगतात.

आपला परिसरा तापी पूर्णाच्या संगमानावर अरण्यक दंडात वसलेला असून मुक्ताबाई चा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहेत जेव्हा जेव्हा संत महात्मे मानवाच्या वेषात या भूतलावर येतात तेव्हा तेव्हा ते मानवाच्या मोक्षप्राप्तीसाठीच प्रयत्न करीत असतात निष्कलंक धाम वडोदे तालुका यावल या भव्य दिव्य अशा समरसता महाकुंभाच्या माध्यमातून आपल्याला देखील आचार्य महामंडलेश्वर श्री.जनार्दन हरीजी महाराज सारे सहृदयतेने समरस झाले पाहिजे. समस्त मानव जातीच्या भल्यासाठी मागणं मागित आहेत. आपण सारे दंडक अरण्यातील रहिवासी असलो तरी आचार्य महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांच्या आशीर्वादाने सारेच समरस झालो आहोत असेच म्हणावे लागणार आहे

-पंकज पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *